नाशिक शहर काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहर काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारणी आगामी निवडणुका आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीकरणाच्या पार्श्वभूमीवर या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांचा योग्य ताळमेळ साधण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटक प्रशासन ॲड गणेश पाटील यांच्या सहीने जाहीर करण्यात आलेल्या या नव्या जडणघडणीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीची ठळक वैशिष्ट्ये सर्व समावेशक नेतृत्व : या कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना आणि विविध प्रदेशांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तरुणांना संधी : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक दृष्टीकोनातून पक्षाने तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली आहे.
अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन : ज्येष्ठ नेत्यांना विशेष निमंत्रित आणि मुख्य निर्णय प्रक्रियेत कायम ठेवून त्यांचा अनुभव जपण्यात आला आहे. प्रमुख जबाबदाऱ्या आणि नियुक्त्या नव्या रचनेनुसार अध्यक्षांच्या मदतीसाठी उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षांतर्गत समन्वय वाढवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे हे या कार्यकारिणीसमोरील मुख्य आव्हान असणार आहे. पक्षाची भूमिका ही नवी कार्यकारिणी पक्षाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. सर्व नवनियुक्त पदाधिकारी एकजुटीने काम करून नाशिक शहरांतील जनसामान्यांचे प्रश्न लावून धरतील आणि आगामी काळात पक्षाला मोठे यश मिळवून देतील,” असा विश्वास काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डाॅ.शोभाताई बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील), शरदराव आहेर, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड व नाशिक जिल्हा अध्यक्ष (उत्तर विभाग) रमेश कहांडोळे, (दक्षिण विभाग) जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांचेसह विविध राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



