आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

सिंहस्थ महाकुंभमेळा : नाशिकच्या गोदातीरावर ५१७ शंखवादकांचा ऐतिहासिक विश्वविक्रम!

नाशिक प्रतिनिधी

आज 25 ऑक्टोंबर 2026 रोजी,अमेरिकेचा एकाचवेळी ३०३ शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत ५१७ व्यक्तींनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरली.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे या सामूहिक शंखनादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमात शंखनादाच्या निनादाने परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या तीरावर एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला.

या वेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.