नवरत्न पुरस्कार स्वीकारताना सुनीता केदारे ( मध्यभागी )- युनिटी फाउंडेशन सोहळा नासिक डॉक्टर राजेश आहेर व मान्यवरांसमवेत

नाशिकमध्ये नवरत्न पुरस्कार सोहळा 2026
युनिटी फाउंडेशन व अशोका कॅन्सर सेंटर तर्फे सुनीता केदारे यांचा सन्मान!
नाशिक शहरात युनिटी फाउंडेशन व अशोका कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नवरत्न पुरस्कार सोहळा 2026, रविवारी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला, समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आले, या सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला युनिटी फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील “नऊरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यामध्ये समाजसेविका सुनिता केदारे यांना त्यांच्या कर्करोग रुग्णासाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल गौरविण्यात आले त्यांच्या सततच्या सेवा आणि समर्पित कार्याची प्रशंसा करत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला सोहळ्याला डॉक्टर राजेश आहेर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की समाजात आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देणे काळाची गरज आहे. सुनिता केदारे यासारखे कार्यकर्ते समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत कार्यक्रमात अशोका कॅन्सर सेंटरचे अधिकारी, डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. सुनिता केदारे यांनी आपल्या सत्कारबद्दल आयोगाचे आभार मानले व ही सन्मानाची काम करण्याची जबाबदारी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा ठरेल असे मनोगत व्यक्त केले. यावेळेस अनेक मान्यवर व संस्थेचे प्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते



