जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस ओमकार पवार यांना राज्यस्तरीय ‘एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६’ जाहीर; राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी संवाद साधून दिल्या शुभेच्छा!

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस ओमकार पवार यांना राज्यस्तरीय ‘एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६’ जाहीर; राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी संवाद साधून दिल्या शुभेच्छा!
भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तबगार अधिकारी तथा जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेतर्फे प्रतिष्ठित राज्यस्तरीय ‘एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारत सरकार मान्यताप्राप्त बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी भ्रमणध्वनी वरुण संवाद साधत त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेतली जात असून :
श्री. ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद नाशिकमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘नवचेतना’ व ‘पोषणदूत’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांच राज्यस्तरावर कौतुक करण्यात येत आहे .
महिला सक्षमीकरण, बालपोषण व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, तसेच उपलब्ध शासकीय यंत्रणा व योजनांच्या प्रभावी समन्वयातून नावीन्यपूर्ण उपक्रमांना मिळवून दिलेले अपेक्षीत यश यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे.
या गौरवपूर्ण यशाबद्दल नाशिक जिल्ह्यातून आणि विविध स्तरातून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमिकर पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई, प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील, मनोहर देसले, महिला परिषद राष्ट्रीय अध्यक्षा सुजाता गुरव,प्रदेश पदाधिकारी रुपेश वराडे, सोमनाथ मानकर, प्रफुल्ल मेश्राम, सुकुमार वाजोळे, नानासाहेब जगताप, संतोष अहिरे, विजय केदारे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राहुल वैराळ,सुनीता केदारे नाशिक जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.



