क्राईम स्टोरीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त निफाड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त! रूट मार्चद्वारे सुरक्षेचा संदेश; गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज

लासलगाव प्रतिनिधी सोमनाथ मानकर

निफाड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरासह पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निफाड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गणेशोत्सव आनंद, भक्ती आणि उत्साहात तसेच शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने निफाड शहरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश देतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. तसेच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. निफाड पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या रूट मार्चमध्ये निफाड पोलीस ठाण्याचे १५ पोलीस अमलदार, गणपती बंदोबस्तासाठी आलेले मुंबई लोहमार्ग पोलीस दलातील ५ कर्मचारी तसेच निफाड पथकातील ३८ होमगार्ड जवान, असे एकूण ५८ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

निफाड पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६२ गणेशोत्सव मंडळे असून, त्यापैकी ५७ मंडळांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. निफाड शहर परिसरात २५ गणेशोत्सव मंडळे असून, त्यापैकी ११ प्रमुख मंडळांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

याशिवाय भाविकांची मोठी गर्दी होत असलेल्या नांदुर्डी येथील श्री वरदविनायक गणपती मंदिरातही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे, महिलांची व नागरिकांची सुरक्षितता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त व निगराणी ठेवण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अफवा, गैरसमज किंवा समाजकंटकांकडून शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून सामाजिक सलोखा आणि शांतता कायम ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव आनंदात साजरा करा; नियमांचे पालन करा!

गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी ध्वनीप्रदूषण, वाहतूक आणि इतर नियमांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ निफाड पोलिसांशी संपर्क साधावा.

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी निफाड पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.