आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

SIR मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्याने दावे-हरकती दाखल करण्यासाठी दोन महिने अधिक मुदत वाढवण्यासाठी काँग्रेसची निवेदनाव्दारे मागणी

नाशिक : प्रतिनिधि

नाशिक १० सप्टेंबर २०२६ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रविण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्या उपस्थितीत SIR बैठक संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्हात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दावे-हरकती दाखल करण्यासाठी दिलेला कालावधी कमी असुन तो अधिक दोन महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावा अशी मागणी बैठकीदरम्यान ज्ञानेश्वर काळे यांनी केली , त्याचप्रमाणे सुनावणी प्रक्रिया सुलभ करुन आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, यासाठी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिक शहर अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, अनुसूचित विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे, वृंदा शेरे, शंकर जाधव, अरुण दोंदे, संदिप वाघ, प्रविण काटे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

 

तसेच दावे हरकती करिता ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर हा कालावधी अपुरा असून याच काळात गणेशोत्सव असल्याने अनेक नागरिक गावी जातात. त्यामुळे दावे व हरकती दाखल करण्यासाठीची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

 

त्याचबरोबर घरोघरी भेट दिल्यानंतर उपस्थित न राहिल्याने ‘गैरहजर’ किंवा ‘स्थलांतरित’ अशी नोंद झाली असल्याने नागरिक मतदानासाठी अपात्र ठरत नाहीत. विशेषतः शहरी भागात बीएलओ भेटीदरम्यान अनेक नोकरदार किंवा विद्यार्थी घरात उपलब्ध नसतात. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांमुळे तात्पुरते राज्याबाहेर वा विदेशात गेलेल्या पात्र मतदारांचे हक्क हिरावले जाऊ नाही कारण तो त्याचा संविधानिक अधिकार असल्याच म्हटलं आहे, यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेच. त्यामुळे अशा नागरिकांनी मसुदा तपासून ३० सप्टेंबर ऐवजी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत दावा सादर करण्यासाठी कालावधी मिळावा अशी मागणी काँग्रेस कडुन करण्यात आली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.