आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाटगांव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी पद भरती…

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांवचांदवड तालुक्यातील भाटगांव ग्रामपंचायत मध्ये शासकीय नियमानुसार पाणीपुरवठा कर्मचारी नेमणुकीबाबत जाहीर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी भाटगांव ग्रामपंचायत क्षेत्रातील उमेदवारांनी लवकरात लवकर भाटगांव ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्ज केलेल्या उमेदवारांतून ग्रामपंचायत नियमानुसार पात्र उमेदवाराची निवड करण्यात येईल. आवश्यकता असल्यास उमेदवाराची लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल, त्याबाबत भाटगांव ग्रामपंचायत च्या नोटीस बोर्डवर सूचना प्रसारित करण्यात येईल. उमेदवार हा भाटगांव ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी असावा, प्रत्यक्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 

भाटगांव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर भाटगांव ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा असे आवाहन माननीय ग्रामविकास अधिकारी व सरपंच सौ. हिराबाई यशवंत पगार यांनी केले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.