आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

महापौर यांनी कत्तलखाना व बीप मार्केट निविदा रद्द म्हणजेच भारताला बीप निर्यातीला अव्वल बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना हरताळ – ज्ञानेश्वर काळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीना पत्र लिहीणार

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकमधील प्रभाग क्रमांक १४ मधील कत्तलखाना आणि बीफ मार्केटची महापौरांनी निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्याने. ह्या निर्णयाचा थेट संबंध देशाच्या निर्यात धोरणाशी जोडला जातो. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक प्रगती आणि निर्यातीचे नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचे सांगितले जाते, परंतु स्थानिक पातळीवरील अशा निर्णयांमुळे उद्योगांना आणि व्यावसायिक विकासाला खीळ बसू शकते,” महापौरांच्या ह्या निर्णयाने पंतप्रधान मोदीच्या बीप निर्यातीत भारताला अव्वल बनविण्याच्या स्वप्नांना खिळ बसणार असल्याचं नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणतात की, भाजप एकीकडे गोमातेच्या नावावर मते मागते आणि दुसरीकडे त्यांच्याच केंद्र सरकारच्या काळात भारत जगात मांस निर्यातीत आघाडीवर पोहोचतो, हा दुटप्पीपणा आहे. नाशिकमधील निविदा रद्द होणे म्हणजे कथणी आणि करणी वेगवेगळी तर आहेच पण धार्मिकतेचा रंग देऊन व्यवसाय करायचा हा केंद्र सरकारच्या व्यापारी धोरणांना बसलेला मोठा धक्का असल्याच मत त्यांनी सांगितलं.”

आमच्या प्रतिनिधींनी श्री काळे यांना विचारले असता त्यांनी याबाबत मोदीना पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगून राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक धोरणे आणि स्थानिक राजकारण यातील विरोधाभास यातुन दिसत असल्याच म्हटलं आहे. तसेच ते पुढे असं म्हणाले की, महापौरांचा हा निर्णय म्हणजे प्रसिद्धीसाठी नसुन अंतर्गत कलहामुळे देशाचं नुकसान करुन महापौराची कारकीर्द संपुष्टात आणण्याचा डाव असु शकतो कारण पंतप्रधानाच्या धोरणांना असा थेट विरोध त्या करणार नाही असं मत त्यांनी नमूद केले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.