नाशिक युवक काँग्रेस आक्रमक ; नागपुर पोलिसांकडून महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल दंडाला काळया फित लावुन तीव्र निषेध करत त्या पोलिसांवर निलंबित करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक ९ सप्टेंबर २०२६ नागपुर मध्ये आयोजित संविधान सन्मान यात्रा विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांचा गळा दाबून फरफटत नेल्याने
पोलिसांकडून अमानुष वागणुकीबद्दल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच्या निषेधार्थ नाशिक शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेस अध्यक्ष जयेश पोकळे यांच्या नेतृत्वाखालील व काँग्रेस नेते ज्ञानेश्वर काळे, अरुण दोंदे यांच्या उपस्थितीत दंडाला काळया फित लावुन तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून मोरे यांच्याशी अत्यंत चुकीचे आणि गैरवर्तणूक केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून, या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते. आंदोलनकर्ते प्रशासनाला निवेदन देण्यासाठी जात असताना, पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्स लावून अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी पोलिसांनी अचानक आंदोलकांवर बळाचा वापर .शिवराज मोरे यांना लक्ष्य करुन पोलीस अधिकाऱ्यांनी गळा दाबून गैरवर्तणूक केले. त्या पोलिसांवर निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच पोलिसांनी शिवराज मोरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले. मोरे हे पोलिसांना शांततेचे आवाहन करत असतानाही, पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या गळा दाबल्याने मोरे यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नाशिक जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप असुन आणि चौकशीची मागणी करत तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कैलास महाले, अशोक शेंडगे, समाधान बागुल, आकाश घोलप, देवेन मारु, हर्षवर्धन कापडणीस, रोहित वाघ, जाबाज खान, महेश देवरे, मोहन बंडकोळी, मच्छिंद्र गायकवाड, भास्कर भोये, सचिन हाडस, पंढरीनाथ बर्डे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.



