नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न !
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक :निसर्ग संवर्धनाचा संदेश देत चिमुकल्यांच्या व नागरिकांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा ‘पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा’ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांच्या संकल्पनेतून व कार्यशाळेचे आयोजक शैलेश मैदं व तज्ञ प्रशिक्षक योगिता बागुल यांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे पार पडली. कार्यशाळेचे मुख्य आकर्षण व उद्दिष्टप्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.”चला, यंदाचा बाप्पा आपल्या हाताने घडवूया!” या संकल्पनेवर कार्यशाळा आधारित होती. सहभागी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून बाप्पाची सुंदर मूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले.
बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यशाळेत कवीन शेळके,शिवांश वाघ, अद्वैत जोशी, शौर्य पाटील, विवान पाटील आदींसह मुल मुली आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. स्वतःच्या हाताने शाडू मातीचा गोळा हातात घेऊन बाप्पाला विविध आकार देण्यात आले. तज्ज्ञ शिबिरकरांनी विद्यार्थ्यांना मूर्तिकलेचे धडे देत सोप्या पद्धतीने बाप्पाची मूर्ती कशी घडवावी, हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले.
यावेळी शहर अध्यक्ष श्री खैरे यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्पघरीच शाडू मातीचा गणपती आणून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित पोपटराव धात्रक, उध्दव पवार, दत्तात्रय सोनवणे, ज्ञानेश्वर काळे आदीसह सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला.



