गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी! खरेदीसाठी शनिवारचा मुहूर्त ठरला गर्दीचा!
नाशिक प्रतिनिधी मनिष तिवडे

नाशिक : – आज 12 सप्टेंबर 2026, गणेशोत्सवाच्या तोंडावर आज, शनिवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अवघे एक दोन दिवस उरले असल्याने, शनिवारी फायदा घेत नागरिकांनी दुकाने आणि बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली होती. यामुळे नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठा अक्षरश,ओसंडून वाहत होत्या.बाजारपेठांमध्ये खरेदीचा,उत्साह,सकाळ पासूनच बाजारपेठेत मुख्यत्वे, कानडे मारुती लाईन, मेन रोड, अशोक स्तंभ, दहीपूल, संत गाडगे महाराज चौक, या बाजारपेठेत, गणेशमूर्ती, मखरे, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई (लाईट्स), पूजा साहित्य आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी लगबग दिसून आली. यंदा बाजारात पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) मखरे आणि कागदी सजावटीच्या साहित्याला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. तसेच, फळे आणि फुलांच्या बाजारातही मोठी उलाढाल झाली.प्रशासनाकडून चोख व्यवस्था शनिवारच्या या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,गेल्या काही दिवसांतील संथ प्रतिसादानंतर, आज शनिवारी झालेल्या या गर्दीमुळे आणि मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. उत्सवाच्या मुख्य दिवसापर्यंत ही गर्दी अशीच कायम राहील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



