ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसचे उद्यापासून नाशिकमध्ये १० दिवस निवासी प्रशिक्षणाला सुरुवात शेवटच्या दिवशी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार 

नाशिक : प्रतिनिधी

:

 

नाशिक दिं. २३, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सचिन राव यांच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून शिबिराच्या नियोजनाला व तयारीला अंतिम रूप देण्यात आले आहे.

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत नाशिकमध्ये २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या काळात १० दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या शिबीराची तयारी पुर्ण झाली असून याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष जेष्ठ नेते मोहन जोशी, भारत पाटील स्थानिक नेते नाशिक शहर अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, नाशिक जिल्हा कॉग्रेस दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, जयेश पोकळे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. अशी माहिती नाशिक जिल्हा कॉग्रेस अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

या बंदिस्त शिबिरात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीं यांचेसह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करणार असून, पदाधिकाऱ्यांसाठी ग्रामीण भागात मुक्काम व मनरेगाच्या अनुभवाचे विशेष नियोजन करण्यात आहे .

२४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत एम.टी.डी.सी, ग्रेप पार्क गंगापूर डॅम नाशिक येथे हे निवासी शिबिर पार पडत आहे. संपूर्ण शिबिर बंदिस्त स्वरूपाचे असून पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास मज्जाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २ सप्टेंबर रोजी शिबिराचा समारोप करताना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील. गावांत मुक्कामाचा टास्क : राहुल गांधींच्या आगमनापूर्वी ७२ जिल्हा व शहर शिबिरार्थींना नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन एक दिवस मुक्काम करण्याचा, गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा व स्थानिक प्रश्न समजून घेण्याचा विशेष टास्क देण्यात आला आहे.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जनमाणसांमधील प्रश्नांची जाण असावी यासाठी प्रशिक्षणार्थी मनरेगा (MNREGA) अंतर्गत कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि श्रमदानात सहभाग घेणार असल्याच प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.