आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

नाशिक RTO कार्यालयावर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा धडक मोर्चा!

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक RTO कार्यालयावर शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचा धडक मोर्चा!
खासगी स्कूल व्हॅन चालकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन आरटीओ (RTO) प्रशासनाकडून सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांनी आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज रोजी 25 ऑगस्ट मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या प्रादेशिक परिवहन
कार्यालयावर (RTO) धडक मोर्चा काढण्यात आला.


या आंदोलनामुळे आरटीओ कार्यालयाचे (RTO) ऑफिसचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने वाहतूकदार व चालक सहभागी झाले होते.
दरम्यान,वाहन चालकांनी फिटनेस नियमानुसार वाहतूक करत असलो तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी गाड्या अडवून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी वाहन चालकांनी दिला.

संघटनेचे शिवसेना उबाठा चिन्ह पाहून कारवाई करत तत्काळ मेमो दिला जातो. कारवाई करणारे अधिकारी म्हणतात शिवसेना उबाठा आम्हाला पगार देत नाही. खाजगी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई होत नाही. मेहनतीने पैसे कमवतो, मात्र अधिकारी पाठलाग करून गाडी पकडतात.

अजीम सैय्यद, वाहतूकदार

आंदोलनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे!

सीटिंग कॅपॅसिटी व लेडी कंडक्टर सक्ती : शालेय वाहनांसाठी ‘७+१’ सीटिंग कॅपॅसिटी मंजूर करावी आणि वाहनात लेडी कंडक्टर ठेवण्याची सक्ती रद्द करावी.
पालकांशी होणारे वाद : लेडी कंडक्टरच्या पगाराचा अतिरिक्त भार पालकांवर टाकून त्यांच्याकडून १५ हजार रुपये वसूल करावे लागतात, ज्यामुळे चालक आणि पालकांमध्ये नाहक वाद निर्माण होत असल्याचा दावा संघटनेने केला.
आर्थिक दंडात्मक कारवाई बंद करा : आरटीओकडून स्कूल व्हॅन चालकांवर सुरू असलेली कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी.
शाळांच्या वेळेत फेरबदल : शहरातील शाळा सुटण्याच्या वेळा एकाच वेळी असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांचे अंतर ठेवावे.
परिवहन समितीत प्रतिनिधित्व : आरटीओमार्फत शाळांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या परिवहन समित्यांमध्ये खासगी वाहन चालकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.