ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र शासन प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणच्या निर्णयविरोधात आंबेडकर समाजाचा नाशिक जिल्ह्यात एल्गार महामोर्चा काढण्यात आला.

नाशिक प्रतिनिधी

आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी गोल क्लब मैदान पासून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व समाज रक्षक अर्जुन पगारे यांनी केले या मोर्चामध्ये सर्व आंबेडकरी समविचारी पक्ष सर्वपक्षीय मार्गदर्शक नेते सामाजिक संघटना कर्मचारी विद्यार्थी समाज बांधव व महिला वर्ग लहान थोर समाजसेवक उपस्थित होते. महामोर्चा गोल क्लब मैदानापासून त्रंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार, या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन संघर्ष समितीतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करून सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने अर्जुन पगारे,प्रकाश जी पगारे, मा अनिल वैद्य, सनी रोकडे, किशोर गांगुर्डे, प्रवीण पगारे, कविता ताई पवार, डॉ. अविनाश शिंदे, प्रशांत खरात, यांनी या मोर्चाच्या संदर्भात मार्गदर्शन केले व उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मागण्या!

एल्गार महामोर्चा च्या मागण्या आरक्षण उपकरणाचा जुलमी निर्णय तात्काळ रद्द करावा. न्यायमूर्ती अनंत बदर समिती अहवाल रद्द करणे. शिक्षण, नोकरी, पदोन्नती, राजकीय प्रतिनिधित्व या सर्व क्षेत्रात आरक्षणाची प्रभारी अंमलबजावणी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार सामाजिक न्यायाची धोरणे राबवावी. उपवर्गीकरणाच्या नावाखाली अनुसूचित जातीत फूट पाडून आमच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे

निवेदन दिल्यानंतर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने मोर्चाचा समारोप केला.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.