आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद शाळेला ४३ इंच एलईडी टीव्हीची भेट; विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला नवी दिशा…

सोमनाथ मानकर

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देवळी (वणी), ता. कळवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ४३ इंचाचा एलईडी टीव्ही भेट देण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक तसेच प्रगतीशील शेतकरी श्री. काशिराम कृष्णा बोरसे यांनी आपल्या पत्नी कै. गुंताबाई काशिराम बोरसे यांच्या पवित्र स्मरणार्थ ही उपयुक्त भेट शाळेला प्रदान केली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. काशिराम बोरसे यांनी ४३ इंच एलईडी टीव्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला.

या एलईडी टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल अभ्यासक्रम, माहितीपट, विज्ञानविषयक प्रात्यक्षिके तसेच विविध ज्ञानवर्धक कार्यक्रम पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी, आकर्षक आणि तंत्रज्ञानाधारित होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.

शाळेला मिळालेल्या या बहुमोल भेटीबद्दल मुख्याध्यापक श्री.कृष्णा बहिरम, शिक्षक श्री. सखाराम बागुल, श्रीमती कल्पना सुर्यवंशी, श्री रामचंद्र बोरसे, श्रीमती आशा थोरात, श्रीमती सोनाली चव्हाण तसेच ग्रामस्थांनी श्री. काशिराम कृष्णा बोरसे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. रामचंद्र बोरसे यांनी केले.

या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या या योगदानाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.