भाटगांव येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि नूतन माध्यमिक विद्यालयात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन प्रभात फेरी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण भाटगांव ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ. हिराबाई यशवंत पगार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच श्री. किरण बाळनाथ भवर, भाटगांव ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. नवनाथ नथू पवार, निलेश अण्णा भवर गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंतर सर्व ग्रामस्थ शाळेच्या आवारात उपस्थित होऊन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. देवरे सर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री. गवळी सर, सौ. पवार मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रवींद्र पोटे आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहणा नंतर नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बोढारे सर यांनी नूतन माध्यमिक विद्यालयातील ध्वजारोहण केले
ध्वजारोहणा नंतर शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास गावातील सर्व नागरिक ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



