ताज्या घडामोडी

श्री. कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था नाशिक, यांच्या तर्फे श्री अजय मिसर सरकारी वकील यांना विशेष कान्यकुब्ज रत्न सन्मान प्रदान करण्यात आला

वार्ताहर : नाशिक

नाशिक लायन्स क्लब पंडित कॉलनी दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी, येथे नुकताच पार पडलेल्या कार्यक्रमात कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था नाशिकच्या वतीने विधीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांना संस्थेच्या वतीने कान्यकुब्ज रत्न सन्मान प्रदान करण्यात आला.
कायद्याच्या क्षेत्रात अजय मिसर यांनी सर्वसामान्यांना मिळून दिलेला न्याय आणि समाजात प्रबोधनाचे केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी यांच्या याच सामाजिक व व्यावसायिक निष्ठेचा गौरव करण्यासाठी समाजाच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित केला गेला.
कार्यक्रमाची प्रास्ताविक श्रीमती राखी दुबे,यांनी केले तर प्रमुख पाहुणे. श्री.नीरज तिवारी, शाम प्रसाद पाण्डेय, सुरेश तिवारी, गिरिश दुबे, यांच्या संयुक्त हस्ते विशेष सरकारी वकील श्री अजय मिसर यांना सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन गौरवण्यात आले यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीरज तिवारी, श्याम प्रसाद पांडे जी, सौ रागिनी वाजपेयी, अजय तिवारी, सौ राखी दुबेजी, यांनी विशेष प्रयत्न केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.