काँग्रेसकडून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा संविधान व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची खरी जबाबदारी काँग्रेस पक्षाची
वार्ताहर : नाशिक

नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन वंदेमातरम गीत सार्वजनिक गात अध्यक्षीय भाषणात उपस्थितीतांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुत्मात्यांना अभिवादन करून देशातील राजकीय सत्ता येते जाते परंतु येथे असलेला प्रत्येक नागरिक हा माझा बांधव आहे त्यामुळे आजची देशातील शेतकरी, कामगार, महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. शिक्षणाचा बोजबारा उडला असुन देशातील परिस्थितीत भयावह होत चाली आहे. देशातील लोकांना जाती – पातीच राजकारण करुन धर्माधर्मात तेढ निर्माण करून सत्ताधारी आपली राजकीय पोळी भाजत आहेत. म्हणून आता संविधान व राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची खरी जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचे त्यांनी नमुद केले.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक माणसाला भेटा त्याच्या अडीअडचणी समजुन घ्या त्याला मदत करा. हाच खरा माणुस धर्म आहे. कोणत्याही जाती धर्माचा व्देषातुन देश, राज्य किंवा गाव प्रगती करु शकत नाही म्हणून सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची आपली परंपरा जपा असा उपरोधिक टोला लगावत आपल्या भाषणाचा समारोप केला. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस (उत्तर विभाग) अध्यक्ष रमेश कहांडोळे, राजेंद्र बागुल, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, नगरसेविका समिना खान, सानिया अत्तार, उध्दव पवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सिराज कोकणी, पोपटराव धात्रक, जयेश पोकळे, बाबा खतीब, स्वप्नील पाटील, सुनील आव्हाड, जाकीर अत्तार, लक्ष्मण जायभावे, धोंडीराम बोडके, संतु पाटील जायभावे, माणिक जायभावे, अभिजित राऊत, गौरव सोनार, भारत पाटील, विजय पाटील, अशोक शेडगे, भालचंद्र पाटील, कुसुम चव्हाण, वृंदा शेरे, मिरा साबळे, नुरी आप्पा, अनिता खरारे, ॲड. सागर वाहुळे, सुदेश मोरे, मंगेश लहांमगे, मोहन शिंदे, रामकिसन चव्हाण, संतोष कस्तुरे, राजेंद्र महाले, हर्षल पवार, संदिप वाघ, गोकुळ राव, कैलास कडलग, इसाक कुरेशी, कैलास महाले, फारुख कुरेशी, जावेद पठाण, राजेंद्र महाले, प्रकाश माळी, संजय पाटील, सईद मनियार, ॲड. सईद सय्यद, अरूण दोंदे, ॲड. सुमित चोपडे, शैलेश मैदं, पोपटराव नागपुरे, मुकेश व्दिवेदी, इरफान बागवान, असिफ पठाण, किसन दुशिंग, आकाश घोलप, भुषण अहिरे, शुभम पाटील, संजय पितळे, सुनिल राजपुत, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



