मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे शुध्दीकरण जातीयतेतुनच – निलेश (बबलु) खैरे नाशिक शहर काँग्रेस कडुन स्वातंत्र्यदिनी ” सत्याग्रह आंदोलनातुन ” निषेध
नाशिक : वार्ताहर

नाशिक : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची उत्तराखंडमधील हलदानी येथील रामलीला मैदानावर ८ ऑगस्टला सभा झाली होती. या सभेत खर्गेंनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. या सभेनंतर सभेच्या ठिकाणी एक शुध्दीकरण यज्ञ करण्यात आला होता. यासाठी नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस व अनुसूचित जाती विभागाकडून ” सत्याग्रह आंदोलन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सभास्थळी यज्ञ करुन केलेले शुध्दीकरण जातीयतेतुनच असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, सी.बी.एस. नाशिक येथे आयोजित सत्याग्रह आंदोलनात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे कुठल्याही जाती, धर्म किंवा मनुष्याचा व्देष करत नाही ही प्रवृत्ती मनुवादाला खतपाणी घालणारी असुन अश्या प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस (उत्तर विभाग) अध्यक्ष रमेश कहांडोळे, राजेंद्र बागुल, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, नगरसेविका समिना खान, सानिया अत्तार, उध्दव पवार, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सिराज कोकणी, पोपटराव धात्रक, जयेश पोकळे, बाबा खतीब, स्वप्नील पाटील, सुनील आव्हाड, जाकीर अत्तार, लक्ष्मण जायभावे, धोंडीराम बोडके, संतु पाटील जायभावे, माणिक जायभावे, अभिजित राऊत, गौरव सोनार, भारत पाटील, विजय पाटील, अशोक शेडगे, भालचंद्र पाटील, कुसुम चव्हाण, वृंदा शेरे, मिरा साबळे, नुरी आप्पा, अनिता खरारे, ॲड. सागर वाहुळे, सुदेश मोरे, मंगेश लहांमगे, मोहन शिंदे, समाधान बागुल, रामकिसन चव्हाण, संतोष कस्तुरे, राजेंद्र महाले, संजय पवार, हर्षल पवार, संदिप वाघ, गोकुळ राव, कैलास कडलग, इसाक कुरेशी, कैलास महाले, फारुख कुरेशी, जावेद पठाण, राजेंद्र महाले, प्रकाश माळी, संजय पाटील, सईद मनियार, ॲड. सईद सय्यद, अरूण दोंदे, ॲड. सुमित चोपडे, शैलेश मैदं, पोपटराव नागपुरे, मुकेश व्दिवेदी, इरफान बागवान, असिफ पठाण, किसन दुशिंग, आकाश घोलप, भुषण अहिरे, शुभम पाटील, संजय पितळे, सुनिल राजपुत, गोरख साळवे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



