प्रति, मा. डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए). विषय: त्रस्त नाशिककरांच्या कडुन आपल्या नाशिकमधील खड्ड्यांच्या आंतरराष्ट्रीय समस्येबाबत आणि मदतीची मागणी.
वार्ताहर : नाशिक

महोदय,
सस्नेह नमस्कार.
वरिल विषयान्वे आपणांस निवेदन सादर करतो की, मी ज्ञानेश्वर रमेश काळे, नाशिक, महाराष्ट्र (भारत) येथील एक त्रस्त नागरिकांपैकी एक असुन आमच्या नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे एवढे मोठे आणि भयानक आहेत की, त्यावरून चंद्र किंवा मंगळावरील मोहिमांची पूर्वतयारी अगदी सहज होऊ शकते.
येथील स्थानिक प्रशासन आणि महापालिका आमची ही समस्या सोडवण्यास असमर्थ ठरली असुन मला स्वतःलाच हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरच सोडवला जाऊ शकतो असा ठाम विश्वास झाल्याने आपण ह्या प्रश्नाला आपला प्रश्न समजून निश्चितच सोडवाला म्हणून, अमेरिकेच्या प्रगत अंतराळ संशोधन संस्था (NASA) किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आमच्या या खड्ड्यांची पाहणी करावी, अशी विनंती आहे.
कदाचित तुमच्या मते हे खड्डे म्हणजे युद्धातील रणनीतीचा भाग ठरु शकतात, पण आमच्यासाठी हे दररोजच्या मरणाचे पाऊल ठरत असुन नाशिकंकर यावर रोजच विविध आंदोलन करत आहेत. त्यावर प्रशासनाकडून किंवा सरकारकडून गंभीर चर्चा होते ती रोज नाशिककर वेगवेगळया वृत्तपत्रातून लोकांपर्यंत पोहचते पंरतु अपघात किंवा खड्डे भरण्यास ही यंत्रणाच निश्चितच कमी पडते आहे असा गंभीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच सुटु शकतो आणि म्हणूनच फक्त आपणच जबाबदारी सोडु शकाल असा आता आमचा ठाम विश्वास झाला असल्याने
तरी आमच्या या नाशिकमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आपण काही निधी किंवा अमेरिकन तंत्रज्ञान पुरवावे, ही नम्र विनंती.
आपला नम्र,
ज्ञानेश्वर रमेश काळे
(एक त्रस्त नाशिककर)
पत्ता: नाशिक, महाराष्ट्र, भारत.



