ताज्या घडामोडी

सागरमल मोदी शाळेत दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन उत्साहात

नाशिक प्रतिनिधी

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, नाशिक येथे दीप अमावस्येनिमित्त दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानिमित्ताने शाळेत विविध प्रकारच्या दिव्यांची आकर्षक आरास मांडण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपपूजनाने झाली. छाया जाधव आणि जयश्री भडके यांनी सूत्रसंचालन केले. सत्र प्रमुख मनीषा जोशी व नीलिमा गायधनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनीषा जोशी यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्येची कथा सांगितली, तर नीलिमा गायधनी यांनी विद्यार्थ्यांकडून श्लोक म्हणून घेतले. मंजुषा झेंडे यांनी दीप अमावस्येची माहिती सांगून या सणाचे महत्त्व स्पष्ट केले.

इयत्ता दुसरीतील सर्वज्ञ शिरसाट, श्रीशा आद्यप्रभू, स्नेहल मांडगे, वंशिका जाधव, साक्षी दळवी, तन्वी लगारे, आराध्या भांगरे, खुशी दिवे आणि विधान अन्सारी या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दिव्यांची ओळख करून दिली.

यावेळी विद्यार्थिनींनी ‘आधी होते मी दिवटी’ ही सुंदर कविता सादर केली. तसेच ‘दिवा पाहुनी लक्ष्मी येते’ या गीतावर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले.

कार्यक्रमात काव्या कनकुटे, काव्या रयारे, सानवी तमखाने, माहेश्वरी देवरे, श्रेया विश्वकर्मा, आरोही पेखळे, आदिश्री भागवत, कनिष्का भोई, प्रियांशी नवले आणि साची पाटील यांनी सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख प्राजक्ता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनासह अश्विनी पगार, किशोरी शुक्ल, भावना नागपुरे आणि सुषमा यादव यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी गणेश गांगोडे, प्रतिभा बाविस्कर, प्रशांत केंदळे, उषा जोपळे, स्वाती महाजन, हर्षल कोठावदे आदी शिक्षक उपस्थित होते.

दीप अमावस्येच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि दीपाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. दीपपूजन, श्लोक, कथा, कविता, गीते, दिव्यांची ओळख आणि नृत्य अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. प्रकाशाचा संदेश देणारा हा दीप अमावस्या सोहळा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.