अर्थकारणताज्या घडामोडीदेश विदेश

मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन रिंग रोडप्रश्नी दिशाभूल केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; १५ ऑगस्टला आत्मक्लेश आंदोलन

नासिक प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन रिंग रोडप्रश्नी दिशाभूल केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; १५ ऑगस्टला आत्मक्लेश आंदोलन

 

नाशिक, दि. १३ ऑगस्ट २०२६ : नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अद्याप ठोस व अंतिम तोडगा निघालेला नाही. शासनाकडून सकारात्मक आश्वासने मिळूनही भूसंपादनाची कार्यवाही आंदोलनातील १४गावांमध्ये पुढे सुरू असल्याने रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हायवे नंबर 29 येथील शेतकऱ्यांच्या सुद्धा मागणीचा शासन दरबारी कुठेही विचार केला जात नसल्याने तेही शेतकरी प्रचंड मानसिक दबावात आले आहेत हक्काच्या जमिनी मोफत घेण्याचे जे धोरण शासनाने अवलंबले आहे या पार्श्वभूमीवर छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून व काळी रिबीन बांधून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.

रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत,कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेतकरी शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती.या बैठकीत रिंग रोडच्या प्रश्नावर संबंधित मंत्री, शासकीय अधिकारी आणि शेतकरी शिष्टमंडळाची सविस्तर उच्चस्तरीय बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते.

मात्र, नाशिक जिल्हाधिकारी व एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी रिंग रोडच्या संदर्भातील वस्तुस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची व अपुरी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली असून,त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचा आरोप रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री व मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असताना स्थानिक पातळीवर भूसंपादनाची कार्यवाही सुरू ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.

शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,रिंग रोडच्या भूसंपादनाची पुढील कार्यवाही अंतिम उच्चस्तरीय निर्णय होईपर्यंत थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा काढावा,या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे करण गायकर यांनी सांगितले.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असून रिंग रोड बाधित सर्व शेतकरी,त्यांचे कुटुंबीय तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन नाशिक रिंग रोड बाधित गावातील शेतकऱ्यांनी केले आहे.

हे आंदोलन पूर्णपणे शांततामय,लोकशाही मार्गाने व सनदशीर पद्धतीने करण्यात येणार असून आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.काळे कपडे व काळी रिबीन हा आंदोलनाचा निषेधाचा प्रतीकात्मक भाग असणार आहे.

 

स्थळ : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

दिनांक : १५ ऑगस्ट २०२६

वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.