क्राईम स्टोरीताज्या घडामोडीसामाजिक

डोंगरगावात अवैध दारू विक्रीवर लासलगाव पोलिसांचा छापा; २.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, आठ जण अटकेत

सोमनाथ मानकर

लासलगाव:- लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे अवैध दारू विक्री व परवान्याशिवाय दारू खरेदी करून मद्यपान करणाऱ्यांवर लासलगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख ४२ हजार ६५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२८ जुलै २०२६ रोजी डोंगरगाव येथील अनिकेत उर्फ बापू नंदू नागरे व राहुल नंदू नागरे हे दारू विक्रीचा वैध परवाना नसताना अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या हॉटेलमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी वापरला जात असल्याचेही निदर्शनास आले. अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न करता ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणाचाही प्रकार उघडकीस आला. याच वेळी ज्ञानेश्वर रामनाथ गांगुर्डे, अनिल भिमराज जाधव, आप्पा रमन सोनवणे, एकनाथ माधव सांगळे, सागर अनिल राख व दत्तू सोमनाथ आव्हाड (सर्व रा. डोंगरगाव, ता. निफाड) हे दारू पिण्याचा वैध परवाना नसताना अवैधरित्या दारू खरेदी करताना आढळून आले.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ८३(१), जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आठ आरोपींना २९ जुलै २०२६ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहा.पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या आदेशान्वये पो.हवा अरुण डोंगरे, पो.हवा ज्ञानेश्वर जाधव, म.पो.हवा उषा आहेर, पोलिस शिपाई संदिप डगळे, चंदु मांजरे यांचे पथकाने

ही धडक कार्यवाही केली. अधिक तपास पो.हवा बाळासाहेब कांदळकर हे करीत आहेत.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.