अर्थकारणआरोग्य व शिक्षणसामाजिक

नाशिकमध्ये आदिवासींचा भव्य ‘उलगुलान जनआक्रोश मोर्चा’!

नाशिक प्रतिनिधी

नाशिक विविध प्रलंबित मागण्यासाठी नाशिक मध्ये सकल आदिवासी समाज आणि सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती विविध संघटनांच्या वतीने नाशिकमध्ये भव्य ‘उलगुलान जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमीन अधिकारांचे संरक्षण, आणि प्रलंबित पेसा (PESA) अंतर्गत नोकरभरती या प्रमुख मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा नाशिकमधील आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलं आहे.गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे व विविध संघटनांचे आमरण उपोषण आणि मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शासनाचे प्रतिनिधी आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आता समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून संपूर्ण जिल्ह्यातून हजारो आदिवासी बांधव, महिला, शेतकरी आणि विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ह्या मोर्चाला गोल्फ क्लब मैदानापासून सुरुवात होऊन त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, पोस्ट ऑफिस, खडकाळी सिग्नल, शालिमार, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस सिग्नल, त्रंबक नाका सिग्नल, मार्गे आदिवासी विकास भवनावर धडकला, मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:-

पेसा (PESA) नोकरभरती आदिवासी क्षेत्रातील प्रलंबित ‘पेसा’ अंतर्गत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची शासकीय भरती तात्काळ पूर्ण करण्यात यावी.विद्यार्थ्यांचे प्रश्न व सवलती: आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे, विद्यार्थ्यांना मिळणारे भत्ते आणि शैक्षणिक सवलतींमधील गैरसोय दूर करणे.वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी: वनजमिनींचे दावे निकाली काढून आदिवासी शेतकऱ्यांना जमिनींचे मालकी हक्क देण्यात यावेत.आरक्षणाचे रक्षण: आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता मूळ सवलती कायम ठेवण्यात याव्यात.जबाबदार मंत्र्यांचा राजीनामा: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत.दरम्यान, वसतिगृह आणि आश्रमशाळांमधील सोयी-सुविधा, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांचा या मोर्चातील सहभाग विशेष लक्षवेधी ठरला असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोर्चादरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आपल्या भावना व्यक्त करताना सरकारला स्पष्ट इशारा दिला. “जोपर्यंत शासन आमच्या सर्व रास्त आणि प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा मोर्चा आणि आमचे उग्र उलगुलान आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.