लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा व आरआरएस कडून दाखल केलेल्या दोषपुर्ण FIR च्या निषेधार्थ काँग्रेस कडुन निषेध आंदोलन
नाशिक : प्रतिनिधि मनिष तिवडे

नाशिक :उत्तराखंडमधील हल्दवानी येथील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळाची भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अंत्यत निदंनिय शुध्दीकरण विधीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जननायक लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी ठाम भुमिका घेतली आणि ह्या कृत्यात सहभागी व्यक्तीवर कडक व कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याच्या व्देषातुनच भाजपा आणि आरआरएस च्या कार्यकर्त्यांनी हल्दवाणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात FIR दाखल केली याच्या निषेधार्थ काँग्रेस कडुन निषेध आंदोलन करण्यात आले.
जातीय भेदभाव व दलितांवर अन्याय अत्याचार करणां-या विरोधात आवाज उठवणा-या विरोधात दडपशाहीसाठी राज्याची पुर्ण यंत्रणाच वापरली जाते. अश्या सुबुद्धीच्या राजकारणाच्या विरोधात नाशिक शहर काँग्रेस कमिटीकडुन ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा आणि आरआरएस च्या मनुवादी कृतीचा निषेध असो, जातीवादी सरकारचा धिक्कार असो, जातीवादाला खतपाणी घालणाऱ्यां सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात मध्य ब्लाॅक अध्यक्ष जाकीर अत्तार, मुश्ताक कुरेशी, जावेद पठाण, इसाक कुरेशी, दत्तात्रय सोनवणे, संतोष कस्तुरे, जावेद शेख, दत्तात्रय वाघ, हर्षल कापडणीस, गोरख साळवे, अमोल मरसाळे, अरुण दोंदे, मंगेश लहामगे, संदीप वाघ, अशोक शेंडगे, शंकर जाधव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



