अधिक मासातील विशेष मंगळवार निमित श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी.
सोमनाथ मानकर

श्री क्षेत्र मोहटादेवी गड -अधिक मास आणि उन्हाळी सुट्टीतील मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने श्री मोहटादेवी गडावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांचे दर्शन होईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले होते. पार्किंग व्यवस्था, दर्शन रांग, जागोजागी पिण्याचे पाणी व्यवस्था, दर्शन रांगेमध्ये जागोजागी सर्क्युलेटिंग फॅन इ. उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेले होते.
देवीच्या दर्शनासाठी गडावर पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “आई राजा उदो उदो” च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलेले होते.
देवस्थान चे अध्यक्ष तथा धर्मादाय उप आयुक्त श्री नवनाथ जगताप व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी गर्दीच्या दिवशी विशेष सुविधांचे देण्याचे नियोजन करण्यात आलेले होते.
देवस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे यांनी देवस्थानच्या आलेल्या भाविकांचे स्वागत केले,



