आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश
सप्तश्रृंगगड येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
सोमनाथ मानकर

आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित, प.पू.ओम दत्त श्री.ठाकूर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तश्रृंगगड, ता-कळवण येथील शाळेत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय ठोके सर तसेच एस. एस. भोये सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी कळवण याच्या हस्ते स्वदेशी जाभूंळ ,बेल,

साल, साग आदि रोपांची शालेय आवारात लागवड करण्यात आली. यावेळी सौ. प्रतिभा बोरस्ते, सिमा गांगुर्डे, सतिश बोरसे, विलास पवार, आकाश सोनवणे,अरविंद पवार, कैलास गवळी, अधिक्षक गोरख भोये, निखिल पाटील, आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते



