सहा. जिल्हाधिकारी कश्मीरा शंखे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने पर्यावरण दिन साजरा
प्रतिनिधी, सोमनाथ मानकर सप्तश्रुंगी गड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सप्तश्रृंग गड येथील रोपवे समोरील वन विभागाच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक जिल्हाधिकारी *कश्मीरा शंखे, IAS* यांच्या हस्ते जाभंळाचे रोप लावून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना शंखे मॅडम म्हणाल्या, “हवामान बदल ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. यावर मात करायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत.
या कार्यक्रमात स्थानिक नागरिक व वन विभागातील अधिकारी , महिला व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांच्या हस्ते जांभुळ, पिंपळ, वड, , उंबर, अशी स्थानिक वृक्षांची 50 हून अधिक रोपे लावण्यात आली.
सहा. जिल्हाधिकाऱ्यांनी संबोधित करताना ‘झाड लावा आणि जगवा’ असा संदेश दिला. व तेथील कर्मचाऱ्यांना रोपांच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली.
याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड, वनपाल रामकृष्ण देवकर, सुनील पगारे, वनरक्षक बाली मंजुळकर, वाहनचालक दिनेश बस्ते ,तसेच श्री क्षेत्र ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पदाधिकारी कर्मचारी गावातील सर्व ग्रामस्थ देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सहायक जिल्हाधिकारी कश्मीरा शंखे यांच्या हस्ते वन परीक्षेत्र अधकारी व वनपाल यांच्या सोबत वृक्षारोपण करताना



