ताज्या घडामोडी

वनअधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून भागवत झाल्टे यांची कृती! 

ज्ञानेश्वर पोटे

वनविभाग निष्क्रिय, पण वन्य पशु-प्राणी मित्र भागवत झाल्टे मैदानात; मुक्या जीवांसाठी स्वखर्चाने उचलला पुढाकार*

भाटगांव-दि. ०४ जून २०२६ येवला वनपरिक्षेत्रातील विसापूर बीट अंतर्गत कातरवाडी-वडगाव फॉरेस्ट परिसरातील अनेक वनतळे भीषण उष्णतेमुळे पूर्णतः कोरडी पडली आहेत. तब्बल ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे जंगलातील हरीण, रानडुक्कर, मोर, ससे व इतर वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असून त्यांच्या अस्तित्वावर गंभीर संकट निर्माण झाले आहे.

अशा परिस्थितीत वनविभागाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत वन्य पशु-प्राणी मित्र तथा समाजसेवक भागवत झाल्टे यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे कोरड्या पडलेल्या वनतळ्यांमध्ये पाणी टाकून मुक्या जीवांना मोठा दिलासा दिला. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील वन्यजीवांना पाण्याचा आधार मिळाला असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

भागवत झाल्टे यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वन्यजीवांसाठी मंजूर निधी, पाणीपुरवठा योजना, वनतळ्यांची देखभाल, जंगल संवर्धन तसेच वनमजुरांच्या थकीत वेतनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्याचे वनमंत्री Ganesh Naik यांच्याकडे याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, वनक्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याअभावी जंगलातील वन्यप्राणी शेतीकडे वळत असून टोमॅटो, मिरची, फुलपिके व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

स्थानिक शेतकरी व वन्यजीव प्रेमींनी वनविभागातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व कार्यातील उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भागवत झाल्टे यांचे अभिनंदन

वनअधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर केवळ टीका न करता प्रत्यक्ष कृतीतून मुक्या प्राण्यांना जीवनदान देणारे भागवत झाल्टे यांचे कार्य प्रेरणादायी आणि समाजासाठी आदर्श ठरत आहे. स्वतःच्या खर्चाने वनतळ्यांमध्ये पाणी भरून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

“मुक्या प्राण्यांना पाणी मिळावे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा; मात्र ही जबाबदारी शासन व वनविभागाचीही तितकीच आहे,” असे मत भागवत झाल्टे यांनी व्यक्त केले.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल भागवत झाल्टे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.