ग्रामपंचायत शिरसमणी यांच्या वतीने इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*
सोमनाथ मानकर

कळवण तालुक्यातील शिरसमणी येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 4 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ग्रामस्थ व महिला तसेच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर आपले मनोगत व्यक्त केले येणार्या भविष्यकाळात विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे अभ्यास करून शासकीय पदे मिळवून आपल्या गावचे नाव रोशन करून एक आदर्श नागरिक म्हणून आपले जीवन जगावे अशी भावना व्यक्त केली तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल पेन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक,महिला व तरुण वर्ग उपस्थित होता. उत्तीर्ण विद्यार्थी कु, सृष्टी भूषण पगार ८८.६०% आर के एम कळवण, कु, देवश्री हेमंत गवांदे ८८.००% माध्यमिक विद्यालय ओतूर कु, पूर्वा भिला पगार ८७.८०% आर के एम कळवण, कु, पायल गणेश गवांदे ८५.२०% माध्यमिक विद्यालय ओतूर, कु, प्राची योगेश वाघ ८५.००% कु, मृणाल ज्ञानेश्वर वानखेडे ८२.८०% माध्यमिक विद्यालय ओतूर, कु,प्रियंका हेमराज गवांदे ८२.४०% माध्यमिक विद्यालय ओतूर, चि. सुदर्शन प्रशांत थोरात ८२.४०% आर के एम कळवण , कु, सई बाळू शिरसाट ८१.४०% माध्यमिक विद्यालय ओतूर, चि. रोहन हरिभाऊ ८०.००% जानकाई माध्यमिक विद्यालय कळवण, चि, हर्षद तुषार गवांदे ७९.८०% आर के एम कळवण , कु, साक्षी अनिल वाघ ७८.००% माध्यमिक विद्यालय ओतूर, पालकांच्या वतीने ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.



