आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

चांदवड येथे कांदा दरवाढ विषयी महाविकास आघाडी तर्फे रास्ता रोको आंदोलन….

ज्ञानेश्वर पोटे

चांदवड – कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असताना राज्यातील सत्ताधारी पक्ष हे विधान परिषदेच्या निवडणुकीत गुंतले आहे.त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी काही देणे घेणे नाही.नाफेडच्या आणि दलालांच्या फायद्यासाठी दोन लाख टन कांद्याचे खरेदीचे नुसती घोषणा केली आहे पण, प्रत्यक्षात खरेदीचा पत्ता नाही.या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सरकारच्या विरोधात चांदवड येथे कांदा प्रश्नी आंदोलन करण्यात आले.

मंगळवार दिनांक 26 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे सकाळी दहा वाजता कांदा उत्पादक शेतकरी यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माननीय आमदार रोहित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, शोभाताई बच्छाव आदींनी बाजार समिती पासून सजवलेल्या बैलगाडीत बसून कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी हजारो कांदा उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग येथील चौफुलीवर बसून रास्ता रोको आंदोलन केले. चांदवड पेट्रोल पंप चौफुलीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतुकीचे देवळा व मनमाड मार्गे नियोजन केल्याने चांदवड येथे महामार्गावर वाहनांची फारशी गर्दी झाली नाही.

आंदोलनादरम्यान शेतकरी व कार्यकर्ते सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देत होते. दरम्यान आंदोलन कर्त्यांनी भर उन्हात महामार्गावर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला पण, काही उपयोग होत नसल्याचे लक्षात येता वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याने महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीस वाहनांच्या टायरची हवा सोडण्याचा प्रयत्न केला. हे रास्ता रोको आंदोलन सुमारे दोन ते अडीच तास चालू होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.