
एक मे रोजी कामगार दिवस ,व महाराष्ट्र दिनानिमित्त निमित्त कळवण वनविभागातील वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपावली गायकवाड यांनी आपल्या अधिनीस्त कर्मचारी आमृत पवार यांना ध्वज फडकवण्याचा मान दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एक उभारी निर्माण झाली आहे.
सप्तश्रृंगी गड येथील कर्मचारी गडावरील समस्यांची ,जंगल संवर्धनाचे,व वन्यजीव संवर्धनाचे चांगले काम केलेले जेष्ठ कर्मचारी अमृत पवार यांच्या हस्ते सकाळी ८.०० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. वन विभागातील कर्मचाऱ्याला झेंडा फडकविण्याचा मान मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी किंवा सेवाज्येष्ठ कर्मचारी यांना झेंडा फडकविण्याचा मान दिला जातो.
वन कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना दीर्घ आणि निष्कलंक सेवेचा सन्मान. वन्यजीव संरक्षणात विशेष योगदान.
वन विभागातील कर्मचारी हा पर्यावरणाचा खरा रक्षक असल्याने, त्यांना मिळणारा हा सन्मान संपूर्ण विभागाचा गौरव असतो.
या कार्यक्रमासाठी वनपाल, वनरक्षक, वनमजुर मोठ्या संख्येने हजर होते.
——————
आज अमृत काकांच्या हस्ते आपल्या कार्यालयात ध्वजारोहण होणे आमच्या कार्यालयासाठी अभिमानाची बाबआहे.कुठेतरी अधिकारी व कर्मचारी यात भेदभाव न राहता, आपण शासनाचे सेवक आहोत , शासनाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांनी केलेली सेवा भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते .
वन परिक्षेत्र अधिकारी
दिपावली गायकवाड ( कळवण प्रादेशिक )
——————–
कामगार दिनानिमित्त कळवण येथील वनविभाग कार्यालयात ध्वजा रोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कर्मचाऱ्यास ध्वज फडकविण्याचा मान मिळाला, ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे
आमृत पवार, वनसेवक प्रादेशिक, कळवण



