तरुप्रीत प्रकल्पांतर्गत केदारपूर (दातली) येथे १५० हून अधिक वृक्षारोपण

तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने बीजारोपण व वृक्षारोपण करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे व प्रियांका केदार ह्यांनी सिन्नर तालुक्यातील केदारपूर (दातली) येथे १५० हून अधिक वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जांभूळ, खिरणी, कडुलिंब, भेंडी, आंबट चिंच, कांचन, सिसव, सीताफळ, मोह यांसारख्या १५० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच हेमंत आव्हाड, प्रा. राहुल बोडके, पोलीस पाटील योगेश केदार, सौरभ केदार तसेच गावातील तरुणवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात हिरवळ पसरावी म्हणून तरुप्रीत प्रकल्पाच्या वतीने भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मंगल सांगळे यांनी सांगितले.
वर्षभर तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यावरणपूरक काम केले जाते. ‘रोपटे आमचे अंगण तुमचे’ ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. बीजारोपण व वृक्षारोपण करूया, वसुंधरेचा हिरवेपणा जपुया हे ब्रीद असणाऱ्या तरुप्रीत प्रकल्पाची हिरवळ मोहीम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.



