आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
ग्रामपंचायत टाकळी (वि) येथील ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

ग्रामपंचायत टाकळी (वि) येथील ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकळी (वि) गावचे सरपंच सौ. अश्विनी राजेश्वर जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. तसेच शहिदांच्या कोनशिलेचे उपसरपंच सौ. वर्षाताई संजय काळे वग्रा.पं सदस्य सौ. ज्योती शिवाजी सुरासे यांचे हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, जि.प शाळा शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल गृहप्रवेश कार्यक्रम करून लाभार्थ्यांना ग्रामपंचायत अधिकारी सो श्री. नितीन गंगाधर शिरसाठ यांचे हस्ते घरकुल प्रमाणपत्र प्रदान आले.



