सप्तशृंगी देवी ट्रस्टविरोधात आमरण उपोषण. उपोषणास बसलेल्या व्यक्तीची दुसऱ्या दिवशी कुठल्याही मार्ग न निघाल्याने उपोषण करता आपल्या निर्णयावरती ठाम
संपादक सोमनाथ मानकर

सप्तश्रुंगी गड-२२ किलो चांदी गायब, कर्मचाऱ्यांचे मृत्यू, सुसाईड नोटचा गंभीर आरोप
व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांची तात्काळ हकालपट्टीची मागणी..
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड आई भगवतीच्या पवित्र गडावरच अन्याय, दडपशाही आणि हुकूमशाहीचा कहर सुरू असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थ करत आहे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टविरोधात थेट जनआंदोलन पेटले आहे. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या कारभाराविरोधात २१ जानेवारी २०२६ पासून ट्रस्ट कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली असून, या आंदोलनाने संपूर्ण सप्तशृंगगड चर्चेचा विषय ठरला आहे.
हे आमरण उपोषण छगन गोविंद जाधव व ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, कर्मचारी संघटना, आदिवासी बांधव, ग्रामस्थ यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. उपोषणस्थळी नवनवीन अर्ज, तक्रारी आणि धक्कादायक पुरावे समोर येत असून, ट्रस्टमधील कथित गैरकारभाराचे भयावह चित्र उघड होत आहे.
२२ किलो चांदी कुठे गेली?
आई भगवतीच्या गाभाऱ्याच्या जिर्णोद्धार कामात तब्बल २२ किलो चांदी लंपास झाल्याचा संशय उपोषण करते जाधव कुटुंब व्यक्त होत आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेतून आलेली ही चांदी नेमकी कुठे गेली, याचा जाब ट्रस्ट प्रशासन देणार का? हा प्रकार थेट आर्थिक अपहार व विश्वासघाताचा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांची उघड पिळवणूक
सातवा वेतन आयोग लागू नाही, २०–२५ वर्ष सेवा करूनही कायम आदेश नाहीत, पदनिश्चितीशिवाय काम करून घेतले जाते, लाडू विभागातील कर्मचाऱ्यांचे तीन वर्षा पासून मासिक स्वरूपात अर्धे पगार अडवून ठेवले, मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे मागूनही नाकारले, एका कर्मचाऱ्याचा मुलगा कायम अपंग झाला—याला जबाबदार कोण? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
कर्मचाऱ्यांचे मृत्यू आणि सुसाईड नोट
तणाव, दबाव आणि छळामुळे आदिवासी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला
आहे
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना
बडतर्फ केल्याशिवाय मागे हटणार नाही
व्यवस्थापकांच्या वेतनाची लेखापरीक्षणातून चौकशी, बेकायदेशीर नेमणूक रद्द करणे, ट्रस्टला झालेली आर्थिक हानी वसूल करणे आणि सुदर्शन दहातोंडे यांची तात्काळ हकालपट्टी—या मागण्यांवर लेखी निर्णय झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
“मी मेलो तरी चालेल, पण आई भगवतीच्या गडावरचा अन्याय उघडकीस आणल्याशिवाय थांबणार नाही,” असा ठाम निर्धार उपोषण करते सामाजिक कार्यकर्ते छगन गोविंद जाधव व ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई गोविंद जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ही केवळ तक्रार नसून, देवस्थानातील कथित हुकूमशाहीविरोधात उसळलेला जनस्फोट असल्याची चर्चा आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
या जाधव कुटुंब उपोषणाला बसले आहे त्यांना पंचक्रोशीतून अनेक संघटनेतून पाठिंबा मिळत आहे तसेच सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ देवी संस्थानचे कर्मचारी यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे ते एकूण सोळा मागण्या घेऊन या उपोषणाला बसले आह
चौकट.,या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचारी कारभार थांबत नाही व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही कारण लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही मी उपोषण सोडणार नाही
उपोषण करते…छगन जाधव बेबीबाई जाधव
चौकट.,या ठिकाणी चौकशी समिती नेमलेली असून तीस दिवसापर्यंत चौकशी पूर्ण करून योग्य तो अहवाल देण्यात येईल असे मत तहसीलदार व विश्वस्त ललित निकम यांनी सांगितले



