वडगाव गुप्ता येथे तरुणाने घेतला टोकाचा निर्णय कुटुंबावर शोककळा
प्रतिनिधी संजय शिंदे

अहिल्यानगर तालुक्यातील आज दि.23 डिसेंबर रोजी वडगाव गुप्ता येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये हृदयद्रावक घटना घडली असून, सागर नारायण पवार (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सागर पवार यांचे वडील नारायण पवार व आई उषा नारायण पवार हे सकाळी सुमारे आठच्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते. त्याच दरम्यान दुपारच्या सुमारास सागरने घरातच टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. दुपारी पालक घरी परतल्यावर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला. शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शंभर क्रमांकावर माहिती देत पोलीस यंत्रणेला कळविले. माहिती मिळताच वडगाव गुप्ता येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीस सुरुवात केली असून, सागर पवार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.



