जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शहीद जवान श्री राजेंद्र पोटे यांच्या मातोश्री गिताबाई पोटे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथील मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादरीकरण केले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षक श्री. गवळी सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रविंद्र पोटे, अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी, आरोग्य अधिकारी-कर्मचारी, भाटगावच्या सरपंच सौ.हिराबाई पगार, उपसरपंच श्री. किरण भवर, श्री. बापू पगार, श्री. अनिल पोटे, श्री. निखिल वैराळ, श्री. नवनाथ पवार, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. रावसाहेब पोटे व सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थ या अभूतपूर्वक 77 व्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित होते.



