
अहिल्यानगर -जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान–गणित अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन (सन २०२५–२६) चे उद्घाटन गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मा.ना. प्रा. राम शिंदे सभापती,विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रयोग, संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सन्माननीय मा.खा. श्री भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा सदस्य शिर्डी,मा.खा. श्री निलेश लंके लोकसभा सदस्य अहिल्यानगर, मा.आ. श्री किशोर दराडे विधानपरिषद सदस्य ,मा.आ.सत्यजित तांबे विधानपरिषद सदस्य ,मा.आ.श्री शिवाजीराव गर्जे विधानपरिषद सदस्य,मा.आ.श्रीम. मोनिकाताई राजळे विधानसभा सदस्य शेवगाव ,मा.आ.श्री संग्राम जगताप विधानसभा सदस्य अ.नगर शहर,मा.आ.डॉ.किरण लहामटे विधानसभा सदस्य अकोले,मा.आ. श्री आशुतोष काळे विधानसभा सदस्य कोपरगाव ,मा .आ.श्री रोहित पवार विधानसभा सदस्य कर्जत-जामखेड, मा.आ. श्री अमोल खताळ विधानसभा सदस्य संगमनेर ,मा.आ.श्री हेमंत ओगले विधानसभा सदस्य श्रीरामपूर, मा.आ.श्री विठ्ठलराव लंघे विधानसभा सदस्य नेवासा ,मा.आ. श्री काशिनाथ दाते विधानसभा सदस्य पारनेर ,मा.आ.श्री विक्रम पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा ,मा.सौ.प्रांजल चिंतामणी नगराध्यक्षा नगरपरिषद जामखेड,मा.डॉ.पंकज आशिया जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मा.श्री आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.अहिल्यानगर, मा.श्री विजय मुळीक अती मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहिल्यानगर हे उपस्थित राहणार आहेत.
आपले विनीत श्रीमती संध्या गायकवाड माध्यमिक शिक्षणाधिकारी, श्री भास्कर पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी, श्री बाळासाहेब बुगे शिक्षणधिकारी (योजना ),श्री शुभम जाधव गटविकास अधिकारी प.सं.जामखेड, श्री अजय साळवे मुख्याधिकारी, नगर परिषद जामखेड ,श्री आकाश दरेकर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी , श्रीमती संध्या भोर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी,श्री संजयकुमार सरवदे उपशिक्षणाधिकारी (योजना),श्रीमती मीना शिवगुंडे उपशिक्षणाधिकारी, श्री प्रदीप चव्हाण गटशिक्षणाधिकारी प.सं .जामखेड ,श्री दत्तात्रय कवळे शिक्षण विस्तार अधिकारी ,श्री सुनील पंडित अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ,श्री संजय कुमार निक्रड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणित महामंडळ ,श्री दशरथ कोपनर अध्यक्ष तालुका मुख्याध्यापक संघ जामखेड ,श्री भगवान मडके मुख्याध्यापक श्री नागेश विद्यालय जामखेड, श्रीमती रोहिणी भोर मुख्याध्यापिका कन्या विद्यालय जामखेड,श्री बद्रीनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष विज्ञान अध्यापक संघ,श्री नवनाथ घुले जिल्हाध्यक्ष गणित अध्यापक संघ, श्री धनंजय भांगरे जिल्हा सचिव विज्ञान संघ, श्री बाजीराव गर्जे अध्यक्ष जामखेड तालुका विज्ञान संघ, श्री भाऊसाहेब इथापे अध्यक्ष जामखेड तालुका गणित अध्यापक संघ हे आहेत.या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण, आरोग्य, तंत्रज्ञान आदी विषयांवरील विविध संशोधनात्मक व कल्पक प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, संशोधनाची गोडी निर्माण करणे आणि नवकल्पनांना चालना देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शन स्थळ : श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय,जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर . हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



