राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे नानासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली लखन साळवे यांची नगर शहर अध्यक्ष पदी निवड
संजय शिंदे

अहिल्यानगर, दि. २० डिसेंबर रोजी
राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ देत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांनी लखन साळवे यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड जाहीर केली. समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली.या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील एस.पी. कार्यालयासमोर लखन साळवे यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष संजय वाल्हेकर यांच्या हस्ते लखन साळवे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नानासाहेब जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघटनेचे सामाजिक उद्दिष्ट स्पष्ट करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील समाजासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. संघटनेच्या विस्तारासाठी सक्षम व सक्रिय नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सत्कारप्रसंगी राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, सहसंघटक पिनू भोसले, ज्योती साठे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त लखन साळवे यांनी नानासाहेब जगताप यांच्या विश्वगामी समाजकार्यला विश्वासास पात्र ठरून संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी निष्ठेने व सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.



