माझ्या जीवनप्रवासात आजचा क्षण अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा आहे.
माझ्या जीवनप्रवासात आजचा क्षण अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा आहे. सनराईज् शैक्षणिक संकुल या माझ्या दैवततुल्य संस्थेमुळे मला समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर प्राप्त झाला. या संस्कारभूमीत घडत असतानाच मला लोकसेवा मराठी न्यूज या नामांकित माध्यम संस्थेत पत्रकार म्हणून निवड होण्याचा सन्मान लाभला, हे माझ्यासाठी शब्दात न मावणारे समाधान देणारे आहे.
या यशामागे अनेक मार्गदर्शक, गुरुजन, हितचिंतक आणि आप्तस्वकीयांचे मोलाचे योगदान आहे.
सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. संजयजी भोरे साहेब, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड / भोरे मॅडम, संचालक तेजस दादा भोरे व यश दादा भोरे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मला नेहमीच दिशा देत आले आहे.
साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय येथील चंद्रकांत सातपुते सर, सुषमा भोरे मॅडम, महेश पाटील सर तसेच माझ्या आयुष्यात आधारस्तंभ ठरलेले हनुमंत वाघमारे मामा, दिनकर सरगर मामा, बुवासाहेब दहीकर मामा यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.
स्व. एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेज येथील प्रा. विनोद बहिर सर, प्रा. प्रदीप भोंडवे प्रा.दादासाहेब मोहिते सर सर, प्रा. सौ.स्वाती पवार मॅडम, प्रा. छबिलाल गावित सर, प्रा. विवेक सातपुते सर यांनी दिलेले ज्ञान व संस्कार माझ्या वाटचालीचा पाया ठरले.
तसेच कै. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक विजयकुमार मनेरे सर, सुनील पठाडे सर, साधना होशिंग मॅडम, सविता काळे मॅडम, अण्णा महारनवर मामा, राम टिळेकर मामा यांचेही मार्गदर्शन मला सदैव प्रेरणादायी राहिले आहे.
सनराईज इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बिभीषण भोरे सर, व्हॉइस प्रिन्सिपल भाऊसाहेब भोईटे सर तसेच अर्चना गिरमे मॅडम, विद्या डोंगरे मॅडम,अंजली कात्रजकर मॅडम, सय्यद सानिया मॅडम, प्रतिभा धेंडे मॅडम, तनुजा सांगळे मॅडम, पूनम तूपेरे मावशी यांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा व आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल आहेत.
या सर्व मान्यवरांनी मला भरभरून शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेरणा दिली. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता, संस्थेत समाजासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, हीच माझी प्रतिज्ञा आहे.
मी प्रा. सुनील विलास घाडगे, आपणा सर्वांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त करतो. यापुढील आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपले प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्यावर असेच कायम राहोत, हीच शिवचरणी नम्र प्रार्थना करतो.



