आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सप्तशृंगी गड घाटातील भीषण अपघातातील मृतांचा आकडा सहावर; नावे आली समोर

मुख्य संपादक राहुल वैराळ

 

सप्तशृंगीगड- येथील गणपती घाटात इनोव्हा कार १००० ते १२०० फुट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर बचाव पथकाला आणखी एक मृतदेह सापडल्याने या अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहचला असून, त्यांची नावे समोर आली आहेत.सप्तशृंगी गड घाटात कार दरीत कोसळली; पाच जणांचा मृत्यू
कीर्ती पटेल (वय ५०) रसीला पटेल (वय ५०) विठ्ठल पटेल (वय ६५) लता पटेल (वय ६०) पचन पटेल (वय ६०) आणि मणिबेन पटेल (वय ६०) अशी मृतांची नावे असून, हे सर्वजण निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सदर इनोव्हा कारमध्ये एकूण सात प्रवाशी होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, आज (रविवारी) दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना वाहन क्रमांक (एमएच १५ बीएन ०५५५) खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरु केले. सध्या आपत्ती व्यवस्थापनाकडून दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पार पडले. 

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.