नाशिक टॉप-10- बॉडी बिल्डिंग स्पर्धा मोहाडी येथे उत्साहात संपन्न
मुख्य संपादक राहुल वैराळ

मोहाडी – पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोहाडी बॉडी झोन जिमची निर्मिती करण्यात आली असून जिम च्या उद्घाटनाचे अवचित्ये साधत जिल्हास्तरीय नाशिक टॉप टेन बॉडी बिल्डींग स्पर्धा घेण्यात आली . सुहिरा पेट्रोल पंपचे संचालक सचिन निकम यांच्या संकल्पनेतून सशक्त युवा पिढी घडविण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांसाठी अद्यावत जिम खुली करण्यात आली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेस भारत आणि आशिया चे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे सर छत्रपती पुरस्कार विजेते यांचे मार्गदर्शन लाभले. सुहिरा पेट्रोल पंप व बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या वतीने आयोजित नाशिक टॉप १० या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घघाटन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव व श्रीमती सुशीला हिरामण निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष निकम ,सचिन निकम, राजू सोनवणे, विनायक निकम आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत सत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. तीन वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी १५ स्पर्धांची निवड करून , पंचाच्या काटेकोर निकालाच्या जोरावर १० विजेत्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत *प्रथम क्रमांक: आशरीफ कुरेशी – फिटनेस लिगसी जिम , द्वितीय क्रमांक: आशिष बोपटे- एन डी फिटनेस , तृतीय क्रमांक: दर्शन वाघमारे- आयकॉन फिटनेस , चौथा क्रमांक: विशाल कोश्मिरे- इक्विनॉक्स जिम ,पाचवा क्रमांक: फैज खलील- मसल फॅक्टरी जिम , सहावा क्रमांक: अभिषेक थोरात- आयकॉन फिटनेस ,सातवा क्रमांक : जयेश परदेशी- एम स्क्वेअर फिटनेस, आठवा क्रमांक: हरिण शेख- एस के फिटनेस , नववा क्रमांक: स्वप्निल सोनवणे – हेवन फिटनेस ,दहावा क्रमांक : फैजान शेख- एस के फिटनेस* यांची निवड करण्यात आली. विजेत्याना विनायक निकम, अनिल निकम ,संतोष निकम ,पवनकुमार निकम , अमोल निकम, गुड्डू देशमुख , अमोल देशमुख , अमोल घोलप ,राजू सोनवणे व मोहाडी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक चे भाऊदास सोनवणे यांनी तर पंच म्हणून किशोर सरोदे, विजय गोसावी, जालिंदर लोंढे, श्रीकांत शेरताटे,रोशन सांगळे, जय ढगे व समाधान निसाळ यांनी काम बघितले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मोहाडी ग्रामस्थ व निकम परिवार यांनी प्रयत्न केले.



