जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जॉगिंग पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी सुनील घाडगे

अहिल्यानगर : प्रोफेसर कॉलनी येथील दिनू भाऊ कुलकर्णी जॉगिंग पार्क परिसरात जागतिक मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात,सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.दिनाक:10 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय लहुजी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनील भाऊ सकट, मानवी हक्क संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ भोसले, सामाजिक कार्यकर्ते लखन साळवे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे दक्षिण विभाग नगर उपाध्यक्ष संजय शिंदे, सहसंघटक पिनू भोसले, युट्यूब रील स्टार संकेत सकट, वैष्णवी केदार आदी मान्यवरांची उपस्थित होते.मानवी हक्कांची जाणीव जनमानसात दृढ व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समाजात पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित करत नागरिकांना अधिकाधिक झाडे लावण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.जॉगिंग पार्क परिसरात पार पडलेला हा उपक्रम पर्यावरणपूरक सामाजिक जाणिवेला वाव देणारा ठरला आहे. मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून समाजहिताचा संदेश देणारा हा स्तुत्य उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.



