ताज्या घडामोडी

सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अडीच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले…

प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोटे

सिन्नर – याबाबत अधिक माहिती अशी की, संजय भिकाजी धनगर (वय ५१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात धनगर यांनी तक्रारदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडी अंती अडीच लाख रुपयांमध्ये हे प्रकरण निकाली काढायचे ठरले. त्यानुसार नाशिक शहरातील सोपान रूग्णालयासमोर लाच स्वीकारत लाचलुचपत पथकाने सापळा रचून धनगर यांना अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी त्र्यंबकेश्वर येथे देखील नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले होते. या प्रकरणात तक्रारदाराला त्र्यंबकेश्वर येथील स्वतः च्या भूखंडावर नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे आहे. यासाठी वास्तूविशारदामार्फत नगरपालिकेकडे ऑनलाईन कागदपत्रे सादर करून विहित शुल्काचे चलनही भरले होते. परंतु, बांधकामाची परवानगी प्राप्त झाली नाही. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी तक्रारदार कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता तेव्हा त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील रचना सहायक (वर्ग दोन) मयूर शाम चौधरी याने स्वतःच्या भ्रमणध्वनीवर २५ हजार असे टाईप करून ही रक्कम सफाई कामगार अमोल दोंदे याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडीअंती १० हजार रुपयांची रक्कम देण्याचे निश्चित झाले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नाशिक येथे तक्रार दिली होती. यानंतर सापळा रचून एसीबीने दोंदे आणि चौधरी यास अटक केली होती.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.