राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाला निर्भीड पत्रकार संघटना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
मुख्य संपादक राहुल वैराळ

कोल्हापूर– भारत सरकार नोंदणीकृत बहुद्देशीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदान तसेच विविध आंदोलनाची व सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन कोल्हापूर येथे होत असलेल्या शाहू महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा मानाचा 2025 निर्भीड पत्रकार संघटना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याचे शाहू महोत्सव संकल्प प्रमुख अरुण कांबळे यांनी पत्रा द्वारे कळविले आहे.
————————
◼️ गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025
◼️ वेळ दुपारी 4 वाजता
◼️ स्थळ :- घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम व राज्यातील पदाधिकारी हा पुरस्कार स्वीकारतील
या कार्यक्रमास आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरीवार उपस्थित राहावे असे आवाहन
श्री. आर. आर. देसाई
राष्ट्रीय महासचिव व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांनी
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व सर्व बहुउद्देशीय



