अर्थकारणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ लिपिकास 7000 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक…

ज्ञानेश्वर पोटे

नाशिक
महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र पांडुरंग भोरकडे (वय 52, राहणार राजकमल बंगला, वृंदावन नगरी, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) असे लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचा भाऊ दिव्यांग असून त्यांची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेली होती, म्हणून तक्रारदार हे नाशिक महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग येथे जाऊन उपायुक्त यांना भेटून भाऊ दिव्यांग असल्याचे सांगून, माझ्या भावाची स्नॅक्सची हातगाडी सोडून द्या. आणि माझ्या भावाची स्नॅक्सची हातगाडी अमृतधाम होकर झोन मध्ये बसवून द्या, अशी विनंती तक्रारदाराने उपायुक्तांकडे केली होती.
त्याप्रमाणे उपायुक्तांनी तक्रारदाराच्या भावाची गाडी सोडून देऊन, त्यांची हातगाडी अमृतधाम होकर झोन मध्ये बसवून देण्याबाबत सदर आरोपी नामे भोरकडे यांना सांगितले होते. तरी भोरकडे यांनी स्नॅक्सची हात गाडी सोडून देण्यास टाळाटाळ करून तक्रारदार यांना दंडाची रक्कम 18 हजार रुपये न भरता त्या मोबदल्यात 9 डिसेंबर रोजी प्रथम 9,000 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंति 7000 हजार रुपये लाचेची रक्कम मागितली. तक्रारदाराने याबाबत लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 11 डिसेंबर रोजी सापळा रचून
महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात फेरीवाला कॅबिनच्या जवळील पुरुषांच्या प्रसाधनगृहात 7000 हजार रुपयांची लाच घेताना आरोपी नामे भोरकडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.