अहिल्यानगर वडगावगुप्त येथे भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी सुनील घाडगे

अहिल्यानगर- वडगावगुप्त येथे आज दिनांक 12 डिसेंबर रोजी बौद्ध विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई यांचे सुपुत्र, भारतीय बौद्ध सभेचे दितीय अध्यक्ष आणि बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमास वडगाव गुप्ता येथील वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष दीपक साहेबराव चांदणे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे अहिल्यानगर दक्षिण उपाध्यक्ष संजय शिंदे, सह संघटक पिनू भोसले, कुंदा शिंदे, शोभा कांबळे, संजय ठोबरे, शाहू कांबळे, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्य, तत्त्वज्ञान व सामाजिक योगदानाचा सन्मानपूर्वक गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या पावलावरून चालण्याचा संकल्प व्यक्त केला. विविध सांस्कृतिक व बौद्ध धम्मविषयक कार्यक्रमाने परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.



