राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाची सहविचार सभा अहिल्यानगरमध्ये उत्साहात संपन्न
प्रतिनिधी घाडगे सुनील

अहिल्यानगर – राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघाची सहविचार सभा रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे महाराष्ट्र सचिव आर. आर. देसाई होते.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्या हस्ते अध्यक्ष आर. आर. देसाई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नाना कापडे, अनिल गायकवाड, कावेरी भिंगारदिवे, संजय शिंदे, पिनू भोसले, नाना विटकर, नवनाथ जाधव, संजू ठोंबे, ज्योती साठे, संगीता भोसले, राजेंद्र भोसले,वंदना मिसाळ, मंजुषा मिसाळ, सुभाष शिरसाट, सुदेश गायकवाड, मच्छिंद्र जगदने, लता देवकाते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात आर. आर. देसाई यांनी समाजकार्य हेच संघाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत, समाजातील गोरगरिबांच्या हक्कांसाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनाथ जाधव यांनी मानले. सहविचार सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



