सप्तशृंग गडावरील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
सोमनाथ मानकर

सप्तश्रुंगी गड
ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते सत्कार.
श्री क्षेत्र सप्तशृंग गड येथील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ आज ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कळवण तालुका अध्यक्ष कुंदन हीरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गडावरील चालता बोलता मदत केंद्राचे संस्थापक, माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, संदीप बेणके यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात चालू वर्षी दहावी व बारावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या वेळी विद्यार्थ्यांना गडावरील प्रशासक रमेश पवार, ग्रामविकास अधिकारी ,जेष्ट नागरीक, युवा उद्योजक, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मेहनत घेण्याचे आणि गडाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला उपस्थित पालकांनी देखील संदीप भाऊंच्या या उपक्रमाचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले .



