नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगांव येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उस्ताहात साजरी…
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त वडनेर भैरव पोलिस स्टेशनचे API – माननीय श्री. सिद्धेश्वर हेमंत आखेगावकर सर व PSI – माननीय श्री. परसराम विठ्ठल तागड सर , बिरसा क्रांती दल नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री. राहुल गांगुर्डे सर यांनी नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले व भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. या कार्यक्रमा प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष व शिक्षण मंडळ भगुर संचालित संस्था सदस्य मा. श्री. चंद्रकांत पाटील (अण्णा) मा.श्री. म्हसू काका पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल पोटे तसेच विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. सारुक्ते सर, पर्यवेक्षक श्री. बोढारे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



